Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेस पक्षातर्फे आदिवासी दिन साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेस पक्षातर्फे तालुक्यातील नरवेल येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

 

मुक्ताईनगर तालुका कॉंग्रेसच्या वतीने  नरवेल  मुक्ताईनगर तालुका येथे आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आदिवासींचे दैवत बिरसा मुंडा यांचे पूजन करून जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

या प्रसंगी आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केले अनिल बारेला,किरण बारेला,राजू बारेला,योगेश बारेला,दिलीप,आकाश,जितेंद्र,कोरकू,नर्सिंग बारेला,लखन बारेला,शुभम भरेला यांनी उपस्थित राहून बिरसा मुंडा जयंती उत्साहात पार पाडला.

 

या कार्यक्रमालाकॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग डॉ.जगदीश पाटील, दिनेश पाटील तालुकाध्यक्ष मुक्ताईनगर,कॉंग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील,अनिल वाडीले प्रदेश सचिर्वींक्षपीं विभाग,तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, शेख भैय्या शेख करीम शहर प्रमुख अंतुर्ली कॉंग्रेस व शिवाजी पाटील तसेच बहुसंख्य नागरिक,आदिवासी महिला भगिनी उपस्थित होत्या.

Exit mobile version