Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप

dhanya vaatap

यावल प्रतिनिधी । युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील आदिवासी भागात धान्य वाटप करण्यात आले.

युवा सेनेतर्फे आदीत्य ठाकरे यांचा वाढदिवस हा आगळ्या वेगळया पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अती दुर्गम भागातील लसुणी बर्डी आदीवासी पाडयावर अत्यंत गोरगरीब मजुरी करणारे आदीवासी बांधवांना यानिमित्त धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात गोरगरीब शेतमजुरीवर अवलंबून आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरणार्‍या आदीवासींना धान्य आणी विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमात शिवसेने जिल्हा उपप्रमुख तुषार( मुन्ना) सांडुसिंग पाटील, यावल तालुका आदीवासी सेलचे तालुकाध्यक्ष हुसैन जहांगीर तडवी यांच्यासह सागर बोरसे, सागर देवांग, युवा सेना शहर उपप्रमुख पिंटु कुंभार, गोटु सोनवणे, शिक्षक सेनेचे गुलाब तडवी, विजय पंडीत, तालुका सरचिटणीस सचिन कोळी,भुरा खान आदी उपस्थित होते.

Exit mobile version