Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदित्य ठाकरे व दादा भुसेंची गुप्त भेट ? : राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा मंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यातच आता दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खाजगी रिसॉर्टमध्ये ही भेट झालीय. आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची भेट झालेलं रिसॉर्ट बेजे गावातील असल्याची माहिती असून या संदर्भात टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे.

या संदर्भात ठाकरे गटातर्फे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी दादा भुसे यांनी मात्र या भेटीचा इन्कार केला आहे. आपण आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त आलो असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Exit mobile version