Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंगळवारी होणार आदिशक्ती मुक्ताईची प्रक्षाळ पूजा !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत आदिशक्ती मुक्ताई माघवारी महाशिवरात्री यात्रौत्सवाची सांगता मंगळवारी सकाळी प्रक्षाळ पूजेने होणार आहे.

यंदाचा माघवारी महाशिवरात्र यात्रौत्सव संत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ मुळमंदिर कोथळी मुक्ताईनगर येथे माघ शु.८ पासुन सुरुवात झाला.तेव्हापासून आजपर्यंत आई मुक्ताईचे दर्शन शेकडो दिंड्या पालख्यासह सुमारे ५ ते ६ लाख भाविकांनी घेतले. यात्राकाळात मंदिर २४ तास खुले ठेवण्यात आले असून आईसाहेबांचे नित्य उपचार बंद असतात. मंदिर परिसराची स्वच्छता करणे व देवतेचा शिणभाग घालविण्यासाठी विविध औषधी काढे देणे असे प्रक्षाळ पूजेचे दोन भाग असतात. यावेळी मूर्तीस लिंबू साखर उपस्थित भाविकांकडून लावून घेतात. महापूजा अभिषेक करण्यात येतो.

दरम्यान, फाल्गुन शु.२ मंगळवार दि. १२/३/२०२४रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मुळमंदिर येथे प्रक्षाळ पूजेस हजर राहावे असे आवाहन श्रीसंत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version