Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरक्षेवर अतिरिक्त ताण;अधिवेशन आज गुंडाळण्याची शक्यता

a161

मुंबई (वृत्तसेवा) देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातले विधीमंडळाचे अधिवेशन आज गुंडाळले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गटनेत्यांच्या बैठक सुरु झाली आहे. या बैठकीनंतर अधिवेशन आज स्थगित होणार असल्याचे वृत्त आहे.

 

 

कालच्या सुरक्षा आढावा बैठकीत चालू बजेट अधिवेशन संपवण्याबाबत विचार झाला होता. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार मुंबईत विधानभवनात परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो आणि सर्व VIP एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील होतो. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधिमंडळात सुरु आहे. या बैठकीत सर्वांशी चर्चा करून अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, अधिवेशन गुंडाळणे म्हणणे पळपुटेपणा आहे. अधिवेशन संस्थगित करायला आमचा विरोध आहे. एकीकडे अॅप उद्घाटन सुरू आहे, सभा सुरू आहेत ,मोदी फिरतात त्यांना संरक्षण लागत नाही का? हे नाटक बंद करा, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Exit mobile version