Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात २४ जानेवारीला ‘आदर्श रिक्षा स्पर्धा २०२०’

 

जळगाव,प्रतिनिधी | मराठी प्रतिष्ठान व परीवहन कार्यालय यांच्या संयुक्त उपक्रमातून ‘आदर्श रिक्षा स्पर्धा २०२०’ शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्याना बक्षीस देण्यात येणार असून प्रत्येकला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मराठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या २ वर्षापासून शहरात आदर्श रीक्षा स्पर्धा घेण्यात येते. यंदा  तिसरे वर्ष आहे. ही स्पर्धा दि. २४ रोजी दुपारी चार वाजता गणपती नगर जळगाव येथे घेण्यात येणार आहे. प्रथम बक्षीस रू. ५०००/-, द्वितीय बक्षीस रू. २१००/-, तृतीय बक्षीस रू. ११००/- रोख व प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्र उपप्रादेशिक परीवहन अधिकारी शाम लोही यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अटी व शर्ती ठेवण्य आल्या आहेत. या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आदर्श रिक्षा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रीक्षेची इन्शुरन्स, फिटनेस, पियुसी, अद्यावत असली पाहीजे. रिक्षा चालकाचे लायसन्स, बॅच व पोशाख नियमानुसार असला पाहीजे.  रिक्षाचे लाईट, इंडीकेटर, नंबरप्लेट नियमानुसार व रिक्षेची अंतर्गत सजावट, प्रवाशांना उपलब्ध असलेली विशेष सुविधा या निकषावर “आदर्श रीक्षा” निवडली जाईल. यापुर्वी झालेल्या स्पर्धेत आदर्श रीक्षा पुरस्कार प्राप्त रिक्षा चालक, मालक यांना सहभागी होता येणार नाही. आदर्श रीक्षा स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता अद्यावत कागदपत्रांसह मराठी प्रतिष्ठानचे  जमील देशपांडे, गणपती नगर, जळगाव व उपाध्यक्ष विजय वाणी नवीपेठ, जळगाव येथे दि.२० जानेवारीपर्यंत नावे नोंदवावी, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेले आहे.

Exit mobile version