Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभिनेत्री असावरी जोशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । अभिनेत्री असावरी जोशी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीचे मुख्यालयात  प्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, मागील वर्षी आसावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक लढवणार अशी शक्यता होता. पण, वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आसावरी जोशी यांच्यावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर असावरी जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सध्याच्या स्थितीत कलाकारांसाठी झटणारा एकमेव पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असं असावरी जोशी म्हणाल्या. कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठबळ हवं, सहाय्य हवं आणि मदत हवी. माझ्या आजूबाजूला सगळेच मदत करणारे लोक आहेत. त्यामुळे मला काही कठीण जाणार नाही. मी नक्कीच कलाकारांचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि एकच ठरवून आले आहे. राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन, असं असावरी जोशी यांनी सांगितलं.

 

 

 

Exit mobile version