Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभिनेता सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश

sunny deol

 

दिल्ली (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

सनी देओलने गेल्या शुक्रवारी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर सनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्याला गुरुदासपूरमधून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर अमृतसरमधून निवडणूक लढवावी असे शहा यांनी सनीला सांगितल्याची चर्चा होती. राजकीय वर्तुळात सनीच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच, आज त्याने भाजप नेत्या निर्मला सीतारमन आणि पियूष गोएल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला गुरुदासपूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत: ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत आहेत, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम त्यांचे पुत्र सनी देओलवरही होण्याची शक्यता आहे.

 

Exit mobile version