Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना तन्वीर सन्मान पुरस्कार जाहीर

Actor Nasiruddin Shah announces Tanvir Samman Award

पुणे प्रतिनिधी । जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा मुलगा तन्वीर याच्या स्मरणार्थ रुपवेध प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ पुरस्कार हा यंदा जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती रुपवेध प्रतिष्ठानच्या कार्यवाह दिपा लागू यांनी आज येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या पंधरा वर्षापासून रुपवेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिने सृष्टीतील कलावंताना तन्वीर सन्मान आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदाचा २०१९ चा तन्वीर सन्मान जेष्ठ अभिनेते ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, तर “तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार महाराष्ट्र कल्चरल सेंटर” या संस्थेला देखील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  येत्या ९ डिसेंबर रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून सन्मानचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, रत्ना पाठक आदी दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती दिपा लागू यांनी दिली.

Exit mobile version