कृषि कायदे मागे घेतल्याने राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्याने आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

 

याबाबत माहिती अशी की, गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे अखेर सरकारला झुकावे लागले आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कायद्याच्या ज्या तरतूदीवर त्यांचा अक्षेप होता. यासाठी देशात शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांनी तीनही कायदे मागे घेण्यात यावा यासाठी गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाला आज यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषि कायदे रद्द केल्यामुळे जळगावात आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मंगला पाटील, सुनिल माळी, दिलीप माहेश्वरी,  उज्जवल पाटील, योगेश देसले, अमोल कोल्हे, सुशिल शिंदे, अनिरूध्द जाधव, विशाल देशमुख, रमेश भारे, सचिन भोसले, विनोद सुर्यवंशी, प्रतिभा शिरसाठ, जितेंद्र बागरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Protected Content