मनसेच्या देशपांडे आणि धुरींवर कारवाई होणार- गृहराज्यमंत्री देसाई

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर कारवाई पूर्वीच ते पोलिसांना चकवा देत निसटले. असे असले तरी या दोघांवर कठोर कारवाईचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले असून कारवाई होणारच, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि संतोष धूरी यांच्यावर कारवाईसाठी पोलीस गेले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानासमोर देशपांडे आणि धुरी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी त्यांना पोलीसानी ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, देशपांडे आणि धुरी या दोघांनी पोलिसांना सोबत येत असल्याचे म्हटले होते.  त्याचवेळी शिवतीर्थ परिसरानजीक पोलिसांच्या वाह्नासमोर एक खाजगी कार  उभी होती. गर्दीतून वाट काढत महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का देत पोलिसांच्या वाहनासमोरच उभ्या असलेल्या खाजगी कारमध्ये बसून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसाना चकवा  दिला. या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

Protected Content