Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिलममधून गांजाचा नशा करणाऱ्या तिघांवर कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहर पोलीसांनी रेल्वे स्टेशन, डी.एस. ग्राऊंड आणि तारा ऑफीस रोड परिसरात केलेल्या छापेमारीत तीन जणांना अवैधरित्या गांजाचे सेवन करतांना रंगेहात पकडल्याची कारवाई सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान केली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भुसावळ शहरात रात्रीच्या वेळी अवैधधंद्यांसह गांजा ओढण्याचे प्रकार वाढले आहेत. या अनुषंगाने सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान भुसावळ शहर पोलीसांनी रेल्वे स्टेशन परिसर, डी.एस.ग्राऊंड आणि तारा ऑफीस परिसर अशा तीन ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत रेल्वे स्टेशन परिसरातून राजू पुनमचंद यावद (वय-५०, रा. हल्दीवाली चाळ, भुसावळ), डी.एस.ग्राऊंड परिसरातून शुभम मदन पवार (वय-२१, रा. धम्मनगर, भुसावळ) आणि तारा ऑफीस रोड परिसरातून चेतन मदन पवार (वय-१९, रा. धम्मनगर, भुसावळ) या तीन जण अवैधरित्या चिलममध्ये गांजा टाकून नशा करत असतांना रंगेहात पकडले आहे.  याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संदेश निकम, विकास बाविस्कर आणि रज्जाक खान हे करीत आहे.

Exit mobile version