Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । एकाच रात्री तीन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यात पाल-खरोदा दरम्यान दोन ४०७ गाड्यांवर तर रावेर शहरात एका ट्रक्टर-ट्रॉलीवर अवैध वाळू वाहतूक करतांना महसूल विभागाने धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

तहसिलदार बंडू कापसे निवासी नायब तहसिलदार सजंय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रात्री वेग-वेगळे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणा-यां विरुध्द धडक मोहीम राबवण्यात आली यामध्ये पाल-खिरोदा दरम्यान १) एमच १० एक्यू ५५०० नंबरची ४०७ पिकअप २)  एमच २० सियु ०२७९ ४०७ पिकअप दोन्ही गाड्यांमध्ये वाळू भरलेली होती.३) एमएच २८ डी ११४५ नंबरचे ट्रेक्टर-ट्रॉली डॉ बाबा साहेब आंबेडकर चौकात पकडण्यात आले महसूल पथकाने केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.केलेल्या कारवाई मध्ये मंडळ अधिकारी निंभोरा पाल सावदा खिरोदा रावेर खानापुर तलाठी मस्कावद पाल खानापुर रावेर मंडळ अधिकारी तलाठी यांचा सहभाग होता.

Exit mobile version