Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अश्लील चाळयांना प्रोत्साहन देणाऱ्या सहा कॅफेचालकांवर कार्यवाही

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगर शहरातील सहा कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत अश्लिल चाळे करणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींच्या बारा जोडप्यांसह सहा कॅफे चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कारवाईवेळी अनेक जोडपी छोट्या केबिनमध्ये अश्लील चाळे करताना आढळून आले. कॅफे चालक जोडप्यांना अश्लील चाळे करण्यासाठी केबिन उपलब्ध करून देत त्यापोटी दर तासाला २०० रुपये दर आकारत असल्याचेही समोर आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सावेडी उपनगर परिसरातील श्रीराम चौक येथील लव्ह बर्डस कॅफे, कुष्ठधाम रोड येथील बाबाज् कॅफे, गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे, नगर मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोरील झेड. के. कॅफे या चार व बुरुडगाव रोडवरील इगलप्राईड कॉम्प्लेक्समधील गोल्डरश कॅफे व चाणक्य चौकातील रिजकिंग कॅफे या दोन अशा सहा कॅफेंवर छापे टाकून बारा ते तेरा जोडप्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी महेश तेलोरे (रा. तपोवन रोड, सावेडी), ऋषीकेश निर्मळ (रा. झोपडी कॅटीन), रोहित कुमार साठे (रा. तपोवन रोड सावेडी), हर्षवर्धन काकडे (रा. तपोवन रोड, सावेडी), सागर उदमले (रा. हिवरेझरे, ता. नगर), रवि चौरे (रा. कल्याण रोड), अर्जुन कचरे (रा. कानडेमळा, सारसनगर) यांच्यावर कोतवाली व तोफखाना ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

कॅफेमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या मुला – मुलींना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. अनेकांनी पालक म्हणून मित्रांना बोलावले होते. मात्र, आई वडील आल्याशिवाय सोडणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली. या मुलामुलींना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक पालकांनी पोलिस ठाण्यातच पाल्यांना चोप दिला.

Exit mobile version