Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चक्री फिरवून सट्टा व जुगार खेळणाऱ्या ३ जणांवर कारवाई

जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या भाजीपाला मार्केटमधील एका दुकानात कॉम्प्यूटरवर चक्री फिरवून सट्टा व जुगार खेळणाऱ्या ३ जणांवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कारवाई केली आहे. तिघांकडून रोख रक्कम, जुगार व सट्टा खेळण्याचे साहित्य असा एकूण ४९ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्री सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या भाजीपाला मार्केटमधील एका दुकानात कॉम्पुटरवरती चक्री फिरवून आकडे व सट्टा असा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पथकाने सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत संशयित आरोपी संतोष नानकराम रामचंदाणी (वय-३२) रा. सिंधी कॉलनी, जळगाव, वसीम शहा शब्बीर शहा (वय-३२) रा. बिलाल चौक तांबापुरा, जळगाव आणि निलेश दिनेश सरपटे (वय-३३) रा. सिंधी कॉलनी, जळगाव या तिघांकडून रोख रक्कम कम्प्युटर, मॉनिटर व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पो.कॉ. सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष नानकराम रामचंदानी रा.सिंधी कॉलनी,जळगाव, वसीम शहा शब्बीर शहा रा. बिलाल चौक तांबापुरा आणि निलेश दिनेश सरपटे रा.सिंधी कॉलनी या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील परीविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पो.कॉ. गोपाळ पाटील, सचिन साळुंखे, पोकॉ. सचिन पाटील, योगेश बारी यांनी कारवाई केली आहे.

Exit mobile version