Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; चालक वाहन सोडून पसार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा नदीपत्रातून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी नागझिरी फाट्याजवळ कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला आहे. याप्रकारणी मंगळवारी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवरील अनोळखी चालक व मालक यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून बेसुमारपणे अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता नागझरी शिवारातील फाट्याजवळ जाऊन विना क्रमांकाचे वाढू वाहतूक ट्रॅक्टर पकडले. दरम्यान पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालकाने जागेवर ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून पसार झाला होता. पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जमा केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल भूषण सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ८ वाजता विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवरील अनोळखी चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गुलाब माळी करीत आहे.

Exit mobile version