Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट्रावल येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक्टरवर कारवाई

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल गावात विनापरवाना बेकायद्याशीर वाळुची वाहतुक करतांना ट्रेक्टर यावल पोलीसा पकडला असुन सदरचे ट्रॅक्टर हे पुढील कार्यवाही करीता यावल तहसीलदार यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, २२ ऑगस्ट रोजी यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार हे आपले सहकारी पोलीस कर्मचारी अशोक जवरे, पोलीस कर्मचारी अशोक बावीस्कर आणी दोन होमगार्ड हे गणेशोत्सवच्या निमिताने अट्रावल येथे ११ .३० वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना गावातील महर्षी वाल्मीक चौकात वाळुने भरलेला स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३o जे ९६३२) याचे सोबत विना नंबर प्लॉटची ट्रॉली ही वाळुने भरलेली वाहतुक करतांना मिळुन आले.

सदरील ट्रॅक्टरवरील चालक शंकर काशीनाथ सोनवणे (रा. भालशिव ता. यावल) यास वाळुच्या वाहतुकी संदर्भातील परवाना बाबत विचारले असता त्यांने आपल्याकडे परवाना नसल्याचे सांगीतले. यावल पोलीसांनी सदरचे परवाना नसतांना वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेवुन यावलचे प्रभारी पो.नि. अवतारसिंग चव्हाण यांच्याकडे कळविण्यात आले असुन पोलीसांनी या बेकाद्याशीर विनापरवाना वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर हे पुढील कार्यवाहीसाठी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याकडे माहीती अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान सदरच्या ट्रॅक्टरवर महसुल प्रशासनाच्या वतीने सुमारे १ लाख ३० हजार रुपये रक्कमची दंड अकारणी करण्यात येणार असल्याचे महसुल प्रशासनाकडुन कळते.

Exit mobile version