गिरणा नदीतून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर आज सकाळी तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक निमखेडी शहरातील कचरा फॅक्टरी भागातून होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मंगळवारी ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला निमखेडी शिवारात कारवाई करण्याचे सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक सुशील पाटील, भूषण सपकाळे, प्रशांत ठाकूर यांनी विनानंबर असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई केली.

दरम्यान पोलिसांना पाहून चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर व ट्रॉली जळगाव तालुका पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत जवळपास १ ब्रास वाळू आढळून आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर व चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

 

Protected Content