Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अन्न परवाना, नोंदणी किंवा नुतनीकरण नसेल तर आस्थापनांवर कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील ज्या अन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना किंवा नोंदणी नसेल, नुतनीकरण केलेले नसेल त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी अन्यथा आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक अधिकारी श्री. अय्या यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

गुरूवार १६ जून रोजी सायंकाळी दिलेल्या दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे की, “जिल्ह्यातील अन्न व्यावसायीकांनी अन्न परवाना किंवा नोंदणी घेतली नसेल तर अन्न परवाना नोंदणी तात्काळ घ्यावे, तसेच ज्यांनी परवान्याचे किंवा नोंदणीचे नुतनीकरण केलेले नाही त्यांनी अन्न परवान्याचे किंवा नोंदणीचे नुतनीकरण तातडीने करुन घ्यावे.

नोंदणी किंवा अन्न परवाना नसलेल्या अन्न आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल. ज्यात पाच लाख रुपयांपर्यंत दंड आणि 6 महिनेपर्यंत कारावासही होवू शकतो. ही कारवाई होवू नये; यासाठी अन्न परवाना किंवा नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर करावेत. यासाठी मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक अधिकारी श्री.अय्या यांनी दिली आहे.

Exit mobile version