Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल पथकाची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रसलपूर जवळील पाल येथील सुकी नदी पात्रातुन अवैध वाळु वाहतूक करणारी तीन ट्रक्टरे तहसिलदार बंडू कापसे यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी पहाटच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.तालुक्यात अवैध वाळु वाहतूक होत असल्याची ओरड असतांना केलेली कारवाई वाळु व्यवसायकांसाठी मोठी चपराक मानली जात आहे.

 

याबाबत अधिक असे की,  पालकडून रसलपुर येथे वाळु घेऊन आलेले तिन ट्रक्टरांवर तहसीलदार बंडू कापसे परवीक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.विशेष बाब म्हणजे आता पर्यंत तहसीलदार पाच वेळा रात्रीच्या वेळी फिल्डवर उतरले आणि पाचही वेळा अवैध वाळूच्या ट्रक्टरांवर कारवाया झाल्या आहे.

 

आज पहाटे वाळूने भरलेल ट्रक्टर क्र (एमच 19 बिजी 3075) दूसरे ट्रक्टर क्र (एमच 19 पी 4197) आणि तिसरे विना नंबर ट्रक्टर पकडले आहे.तहसीलदार पाठोपाठ निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांनी देखिल गौण खनिज ट्रक्टरांवर कारवाई करण्याची तत्परता दाखवण्याची गरज आहे. विशेष बाब म्हणजे आता पर्यंत झालेल्या कारवाया सर्वात जास्त पाल पट्यातील आहे.शहरासह पूर्व भागात देखिल मोठ्या प्रमाणात ट्रक्टरांद्वारे वाळू वाहतूक होते असते परंतु महसूल मधील एका अधिका-याच्या आशीर्वादामुळे ते वारंवार वाचत आहे.

 

आज पहाटे केलेल्या कारवाईत मंडळ अधिकारी पाल निलेश धांडे रावेर मंडळ अधिकारी  यासीन तडवी खिरोदा प्र यावल जे डी बंगाळे खानापुर मंडळ अधिकारी विठोबा पाटील निंभोरा दिपक गवई तलाठी पाल गुणवंत बारेला खानापुर तलाठी गोपाळ भगत रावेर तलाठी स्वप्नील परदेशी सावखेडा तलाठी निलेश चौधरी कोतवाल गणेश चौधरी यांचा सहभाग होता.

Exit mobile version