Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजी भिडेंवर कारवाई हवीच – आठवले

सोलापूर/ मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी सबळ पुरावे शोधून कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे रिपाई चे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच या प्रकरणात ४१ आरोपीं विरोधात यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल आहे. परंतु भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे कोणतेही सबळ पुरावे संभाजी भिडे यांच्याविरुद्ध उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे भिडे यांचे नाव दोषारोप पत्रातून काढून टाकण्यात आले आहे. असा खुलासा मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणी दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी सादर केला आहे.
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव दोषारोपपत्र यादीतून वगळण्यात आले आहे, मात्र असे असले तरी या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने भिडे यांची सखोल चौकशीसह सबळ पुरावे शोधणे आवश्यकच आहे. त्यासंदर्भात भिडे गुरुजींवर कारवाई होण्याबाबत आग्रही भूमिका असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. आठवले यांनी सोलापूर येथे दौऱ्यावर आले होते यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलतांना म्हटले घेतली आहे.

Exit mobile version