Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात प्लास्टीक बॅग वापरणार्‍या दुकानदारांवर कारवाई ( व्हिडीओ )

plastic

जळगाव प्रतिनिधी । प्रतिबंध घालण्यात आल्यानंतरही प्लास्टीक बॅगचा वापर करणार्‍या दुकानादारांवर आज कारवाई करण्यात आली.शहरातील सिंधी कॉलनी परिसरात आज प्लास्टीक बॅग वापरणार्‍या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पाच विक्रेत्यांकडून सुमारे 36 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

शहरातील बळीराम पेठ, फुले मार्केट, पोलन पेठ, अशोक टॉकीज गल्ली, सिंधी कॉलनी, रामानंद नगर आदी भागात तीन पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली असून सदरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमृतकर प्रोव्हिजन, बाबा ट्रेडर्स व नितीन मकारिया या तीन दुकानदारांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला असे एकुन 36 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला तर १५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच दिवसभर ही करवाई सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई महापालिकेच्या आरोग्य खात्याचे ए एस के खान, आर.आर. बारसे, के.के. बडगुजर, व्ही.जी. वानखेडे, एल.बी. धांडे, अल्ताफ शेख, फकीरा अडकमोल, धर्मेंद्र चांगरे यांच्या पथकाने केली.

पहा । प्लास्टीक दुकानावर कारवाई करत असतांना अधिकारी

 

Exit mobile version