Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गौणखनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे सिम शिवारातील सप्तशृंगी मातेच्या मंदिराजवळून विनापरवाना गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल मंडळाच्या पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे सिम शिवारातील सप्तशृंगी मातेच्या मंदिराजवळून रोडवर ट्रॅक्टरमधून विनापरवाना गौण खनिजाची ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मंडळाधिकारी गौरव शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी मंडळ अधिकारी गौरव यशवंत शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर नागराज पाटील वय-५० रा. टाकरखेडा ता.अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.

Exit mobile version