Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंमली पदार्थाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅक परिसरात आमली पदार्थ गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅक परिसरात काही तरूण हे आमली पदार्थ गांजा हा चिलमच्या मदतीने नशा करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मेहरूण ट्रॅकवर आल्यानंतर छापा टाकला. यात रिषभ राजेश मंदान वय २३ रा. आदर्श नगर, जळगाव हा तरूण नशा करतांना आढळून आला. त्याला पोलीसांनी ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात हजर केले. पोकॉ नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Exit mobile version