Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

करंजी येथे तलवार बाळगणाऱ्यावर कारवाई; गुन्हा दाखल

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील करंजी येथे दहशत निर्माण करणाऱ्या दोघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश सुरेश पाटील (26) व नंदूलाल पंढरी पाटील (25) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत ठाकूर यांनी फिर्याद दिली. संशयित गणेश पाटील याने जनावरांच्या गोठ्यात तलवार लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर 27 रोजी दुपारी अडीच वाजता सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली

Exit mobile version