Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोखंडी सुरा घेवून दहशत माजविणाऱ्या एकावर कारवाई

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील तुकाराम वाडी परिसरात हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरात संशयित आरोपी सचिन उर्फ टिचकुले कैलास चौधरी वय २५ रा. तुकाराम वाडी जळगाव हा तरूणी हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी ६ मार्च रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी सचिन चौधरी याच्या विरोधात कारवाई केली. पोलीसांनी लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सचिन चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.

Exit mobile version