Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर शहरात विजचोरी करणाऱ्या १३ जणांविरुध्द कारवाई

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मदिना कॉलनीमध्ये  विजचोरी करणाऱ्या १३ जणांविरोधात महावितरणच्या पथकाने कारवाई केली.

 

महावितरण विभागातर्फे रावेर शहरात विज चोरी करणाऱ्यां विरुध्द मोहीन राबवण्यात आली. महावितरणचे उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मदिना कॉलनीत राबवली यावेळी विजेची चोरी करणाऱ्या १३  जणांविरोधात कारवाई करून दंड देण्यात आकारण्यात येणार आहे. शहरात ही मोहीम अशिच सुरु राहील कोणीही  विज चोरी करू नये, रितसर मीटर घेऊनच कनेक्शन घेण्याचे अवाहन साहय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी केले आहे. यावेळी पथकामध्ये समीर तडवी, देवेंद्र महाजन, संतोष जाधव व इथर कर्मचारी सतीश चौधरी, भिका साळुंखे, अमोल हिवरे, धनंजय पाटील, चंद्रकांत ठाकूर, चेतन भरते,दिलीप कोष्टी, अरुण माळी, कल्पेश पाटील, महेश चौधरी यांचा समावेश होता.  यावेळी कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरीकांची गर्दी झाली होती.यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले होते. या कारवाईची रावेर शहरात एकच चर्चा होती.

 

Exit mobile version