जळगाव शहर व तालुक्यातून हद्दपार असलेल्या आरोपीस तांबापुरातून अटक

जळगाव प्रतिनिधी । गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर जळगाव प्रांताधिकारी यांनी केलेल्या हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणारा संशयित आरोपीला राहत्या घरातून आज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, गणेशोत्सवाला १० सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध गणेश मंडळात शांतता राहण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील उपद्रवींविरोधात कारवाईसाठी प्रांताधिकारी यांच्याकडे शहरबंदीचे प्रस्ताव सादर केले होते. यात  २० जणांना जळगाव शहर आणि तालुक्यातून २० सप्टेंबरपर्यंत हद्दपार केले होते. दरम्यान जळगाव शहरातील तांबापूरा भागात हद्दपार असलेला आरोपी शहरात आल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. सतिष गर्जे, सचिन पाटील, साईनाथ मुंऐ आणि सुधिर साळवे यांनी हद्दपार असलेला आरोपी विठ्ठल आत्माराम नेरकर (वय-२७) रा. दत्त नगर, मेहरूण याला रविवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. पो.ना. सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content