खूनाच्या गुन्ह्यात १६ वर्षांपासून फरार आरोपीला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज । जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीला तब्बल १६ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनला सन १९९९ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या बंदी फरार आरोपी प्रदिप सोनु मेढे वय-५८ रा. वंजारी टेकडी, समतानगर, जळगाव यास जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बंदी फरार याने उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे अपील केली असता उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद यांनीसुध्दा शिक्षा कायम केली होती. त्यानंतर आरोपीतांनी सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे अपील दाखल केल्यानंतर बंदी फरार सन २००६ मध्ये अपील जामीनावर सुटलेला होता.

सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी सुध्दा गुन्हयांतील आरोपीतांची शिक्षा कायम केली आहे. त्यानंतर बंदी फरार प्रदीप मेढे हा न्यायालयात हजर झालेला नाही. तेव्हापासुन तो फरार असल्याने त्यास अटक करण्याबाबत उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादकडील अन्वये बंदी फरार यास अटक करून न्यायालयात हजर करण्याबाबत आदेश झाले होते.

त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना आरोपीताचे शोध घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.

प्रदीप मेढे हा सन २००६ पासुन फरार होता. त्याचे शोधकामी एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी त्यांचे पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, हवालदार सुनिल दामोदरे, अश्रफ शेख, पोना.नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, राजेंद्र पवार यांचे पथक तयार केले. शुक्रवार, दि. १७ जून २०२२ रोजी रात्री बंदी फरार प्रदिप सोनू मेढे हा समतानगर, जळगाव येथून आरोपीला ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले आहे.

Protected Content