Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हवा भरतांना ट्रकच्या चाकाखाली आल्याने क्लिनरचा दुदैवी मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

धरणगाव-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील रेल गावात ट्रकची हवा भरण्यासाठी उतरलेल्या क्लिनरचा पुढच्या चाकाखाली आल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. याला जबाबदार असलेल्या ट्रक चालकाविरोधात सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र मश्चिंद्र पवार (वय-४३) रा. तामसवाडी ता.पारोळा असे मयत झालेल्या क्लिनरचे नाव आहे.

 

याबाबत अधिक असे की, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे जितेंद्र पवार हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. ट्रकवर क्लिनरचे काम करून आपली उपजिवीका भागवत होता. गेल्या काही वर्षांपासून जितेंद्र हा ट्रक क्रमांक (एमएच १८ व्हीजी ९५५५) वर क्लिनर म्हणून कामाला होता. त्यांच्यासोबत चालक सिया सारण शाहू रा. मोहाडी ता.जि.धुळे राहत होता. शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जितेंद्र हा चालक सिया शाहू याच्या सोबत ट्रकवर काला होता. त्यावेळी दोघेजण  ट्रकने धरणगाव तालुक्यातील रेल येथे कामानिमित्त आलेले होते. गावाच्या बाहेर असलेल्या गॅरेजवर ट्रकची हवा भरण्यासाठी जितेंद्र पवार हा खाली उतरला होता. ट्रकच्या पुढच्या चाकात हवा भरत असतांना ट्रकवरील चालक याने कोणतीही खात्री न करता ट्रक जोरात चालविला. यात जितेंद्र याच्या पायावरून ट्रक केल्याने गंभीर जखमी होवून त्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान मयत जितेंद्र पवार यांचे वडील मश्चिंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीसात ट्रक चालकाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार ट्रकचालक सिया शाहू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.

 

Exit mobile version