२२ वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यू – कुटुंबियांची कंपनी मालकाकडून मदतीची अपेक्षा (व्हिडीओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी | मागील सहा वर्षांपासून एका प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला असलेल्या कुबेर जितेंद्र राजपूत २२ वर्षीय तरूणाचा आज कामावर असतांना अपघाती मृत्यू ओढवला आहे. कंपनी मालकाने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.

याबाबत कळलेली माहिती अशी की, ‘तरसोद येथील कुबेर जितेंद्र राजपूत हा २२ वर्षीय तरुण मागील ६ वर्षापासून जळगाव येथे ‘शिवतेज प्रिंटींग प्रेस’मध्ये कामावर होता. तो आज देखील तो कामावर वेळेवर आला होता.

सायंकाळी ५ ते ५.१५ वाजेच्या दरम्यान कंपनी मालकांकडून कुबेरचे पाहुणे दीपक यांना फोनवरून ‘कुबेर चक्कर येऊन खाली पडल्याची’ माहिती दिली. त्याला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून सिव्हीलमध्ये दाखल केले असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

खबर मिळताच कुबेरच्या कुटुंबीयांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. यावेळी त्यांनी कुबेरच मृतदेह बघितल्यावर त्यांना त्याच्या दोन्ही डोळ्यात व्रण आढळून आलेत. यामुळे त्याच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून कंपनीकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

यावेळी कुबेरचे वडील जितेंद्र राजपूत यांनी त्यांच्या मुलाला कोणी सिव्हीलमध्ये भरती केले याची माहिती नसल्याचे सांगितले तर कुबेर याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये व्रण दिसत असून हा अपघात नेमका झाला कसा ? याची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी कुबेरच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्याच्या मागे आई, वडील आणि ५ बहिणी असा परिवार आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/542221577560955

Protected Content