अपघात : कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एसबीआय बँक चौकात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून पाय फ्रॅक्चर झाला आहे. जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील पवन ईश्वर खरे हे कामानिमित्ताने २५ एप्रिल रोजी त्यांच्या मित्राची दुचाकी घेवून जळगावात आले होते. यादरम्यान स्टेट बँक चौकात चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचे नुकसान झाले तर, पवन खरे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होवून पाय फ्रॅक्चर झाला. उपचार घेतल्यानंतर पवन खरे यांनी तब्बल दीड महिन्यानंतर मंगळवार, ७ जून रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन (एमएच १९ सीव्ही ९९३९) वरील क्रमाकांच्या चारचाकीवरील चालकाविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक फिरोज तडवी हे करीत आहेत.

Protected Content