Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Accident : रोटवद गावाजवळ अपघात; दोन ठार, दोन जखमी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । तालुक्यातील रोटवद गावाजवळ दुचाकीच्या अपघातात एकाच परीवारातील दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना रात्री घडली आहे. जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी रा. नरडाणा, ता. शिंदखेडा जि.धुळे हे आपल्या आई आणि दोन मुलांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे भेटण्यासाठी दुचाकीने आले होते. भेट झाल्यानंतर दुचाकीने परत जात असतांना धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना प्रभाकर सुर्यवंशी यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांनी पुढे जात असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रभाकर सुर्यवंशी आणि त्यांची सात वर्षाची मुलगी नायरा याचा मृत्यू झाला तर आई ममता रघुनाथ सुर्यवंशी आणि मुलगा मोहित प्रभाकर सुर्यंवशी (वय-९) हे गंभीर जखम झाले आहे. जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ, सपोनि जितेंद्र पाटील, पो.ना. दिपक पाटील, विनोद संदानशिव, विजय धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Exit mobile version