Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातातील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

 

जळगाव प्रतिनिधी । अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सरोजसिंग शिवदार रायसिंग (वय-35) सुप्रिम कॉलनी हा 25 जुलै रोजी सकाळी कामावर दुचाकीने जळगाव औरंगाबाद महामार्गावरील मारूती सुझुकी शोरूम जवळून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात सरोजसिंग हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. आज 26 रोजी पहाटे 4.15 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीसात डॉ. अमित हिवरकर यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Exit mobile version