Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात ; तीन मित्रांचा मृत्यू ; ५ जखमी

accident

 

पुणे (वृत्तसंस्था) पुणे-सातारा महामार्गावर शिवापूर फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडला.

 

या संदर्भात अधिक असे की, तळजाई पठार परिसरात राहणाऱ्या या मित्रांनी सोमवारी रात्री पार्टी केली. त्यानंतर त्यांचे शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला जायचे ठरले. मध्यरात्री साडेबारा वाजता ३ मोटारसायकलवरुन ८ जण निघाले. सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे आले असताना पाठीमागून सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकची त्यांच्या तीनही मोटारसायकलला धडक बसली. त्यात अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे यांचा मृत्यू झाला तर करण जाधव, राकेश कुऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे हे जखमी झाले आहेत. हे सर्व पुण्यातील तळजाई झोपडपट्टी येथील रहिवासी होते. जखमींना भोरच्या श्लोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version