Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघात ; सहा जण जखमी

accident5 201905244186

 

मुंबई वृत्तसंस्था । पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव होंडा कारची सुरक्षा रक्षक लोंखडी ग्रीलला जोरदार धडक बसली. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून यात दोन तरुणी तर चार तरुणांचा समावेश आहे. ओझर्डे गावाजवळ फुड मॉल समोर हा अपघात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चालक हर्ष वर्धनता (वय-२०), पार्थ गोगिया (वय-२०), नितिन सिंग चौधरी (वय-१९), अनिशा जैन (वय-१९), ब्रिजल पालेजा (वय-१९), आदित्य सिंग (वय-१९) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. लोहगाव येथील डी.वाय पाटील मधील सहा विद्यार्थी हे आज पहाटे मोटारीने लोणावळ्याला फिरण्यासाठी जात होते. तेव्हा, भरधाव वेगात असलेल्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार द्रुतगतिमार्गावर पत्र्याच्या सुरक्षा कठड्यावर जोरात जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, सुरक्षा कठड्याचा पत्रा मोटारीत शिरला आहे. यात मोठ्या प्रमाणावर मोटारीचे नुकसान झाले असून अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

Exit mobile version