Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात ; तीन जणांचा मृत्यू, 16 जखमी

accident pune mumbai express

मुंबई प्रतिनिधी । मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी खासगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी 4 वाजेच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. 21) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कामशेत बोगदापासून काही अंतरावर पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही खासगी बस कामशेत बऊर गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसली. अपघातावेळी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सयाजी पाटील, संभाजी पाटील आणि मोहन नलावडे अशी मृतांची नावे आहेत. तर 16 प्रवासाशी जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्ग तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील पावना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं कळतंय. हे सर्व प्रवासी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात असल्याचं वृत्त आहे.

Exit mobile version