Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव – मालेगाव रोडवर अपघात : एक जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी । कॉलेजचे काम आटोपून स्कुटीने चाळीसगावकडे येत असताना मालेगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चालक जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कॉलेजचे काम आटोपून तिघे जण स्कुटीने चाळीसगावकडे येत असताना अचानक मालेगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटी (क्र. एम. एच. ०५ ईई ४०९८ ) वरील चालक अविनाश विष्णू मोरे (वय-२०) रा. गोविंद नगर कल्याण जि. ठाणे याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले मयुर यशवंत मांडवे रा. कल्याण जि. ठाणे व केतन कैलास चव्हाण रा. खडकी ब्रु. ता. चाळीसगाव या दोघी जणांना गंभीर दुखापत झाली. हि थरारक घटना बुधवार, १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील देवळी गावाजवळील डांबरी रस्त्यावर झाली. घटना घडताच अज्ञात वाहन धारक (नाव गाव माहित नाही) त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन पसार झाला. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयूर यशवंत मांडवे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७,३३८, ४२७, १८४ मोटार वाहन अधिनियम व १३४(ब) अशा विविध कलमान्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास संजयकुमार हिलाल पाटील हे करीत आहेत.

 

Exit mobile version