Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार राजूमामा भोळे यांच्या दुचाकीला अपघात

injured rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । आमदार राजूमामा भोळे यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्यांना दुखापत झाल्याची घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, आमदार राजूमामा भोळे हे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास रिंग रोडवरून जात असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला असून त्यांना थोडी दुखापत झाली आहे. यानंतर लागलीच त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राजूमामा भोळे यांना अपघात झाल्याची माहिती शहरात पोहचताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रूग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पत्नी तथा महापौर सीमा भोळे यादेखील रूग्णालयात त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. ताज्या वृत्तानुसार आमदार भोळे यांना झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची नाही. यामुळे ते लवकरच सार्वजनीक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version