Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्य चौकात दुचाकीस्वाराला बसची धडक

swatantra chauk apghat

जळगाव प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकात सिग्नलवर उभ्या असणार्‍या दुचाकीस्वाराला बसने घडक दिल्याची घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, शहरातून आकाशवाणी चौकातून महात्मा फुले मार्केटकडे जाण्यासाठी योगेश चौधरी हे साडेअकराच्या सुमारास सिग्नल नसल्याने आपल्या दुचाकीवर उभे होते. इतक्यात त्यांच्या मागे बस थांबली. सिग्नल चालू होताच बस चालकाने समोर उभ्या असणार्‍या योगेश चौधरी यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांना धडक दिली. यात त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने ते वा अन्य कुणी जखमी झाला नाही. मात्र योगेश चौधरी यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधीत बस चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version