Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोण्याजवळ मोटारसायकलींची धडक; दोन ठार; एक गंभीर

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । यावल ते फैजपूर दरम्यान हिंगोणा गावाजवळ आज सकाळी दोन मोटारसायकलींच्या झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल ते फैजपूरच्या दरम्यान असणार्‍या हिंगोणा गावाजवळ आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हिरो होंडा क्रमांक (एमएच १९-डीई ९७८७ ) व प्लॅटीना (एमएच१९-एएल ९६९१) या दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या. यात अल्लाउद्दीन मुबारक तडवी (रा. फैजपूर) व पंखा पवार ( रा. हलखेड ता मुक्ताईनगर) या दोन्ही मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जखमी झाले आहेत. यातील नवाब मुबारक तडवी रा.फैजपुर आणि रितेश धारसिंग पवार रा. हलखेड ता मुक्ताईनगर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version