Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी घसरल्याने अपघात; प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । कंपनीतून घरी येत असतांना दुचाकीवरून घसरून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश एस.पाटील रा. वराड सीम, तीन दगडी वार्ड जळगाव हे एमआयडीसी कंपनीत कामाला होते. २७ जुन रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्यासुमारास एमआयडीसीतील शुभम लॉजिस्टीक समोर सुप्रिम कंपनीकडून घरी भरधाव वेगाने जात असतांना दुचाकी क्रमाक (एमएच १९ एल ९७२२) स्लीप झाली. यात अपघतात राकेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ९ जुलै रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा सुहास पाचपांडे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version