Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघात : धावत्या बसवर भला मोठा वृक्ष कोसळला

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रवाशांना घेवून जात असलेल्या भरधाव बसवर अचानक झाड कोसळल्याची घटना दुपारी घडली आहे. यात १२ प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल आगाराची बस क्रमांक (एमएच २०, बीएल २५४२) ही आज दुपारी २ वाजेच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जात असतांना रस्त्यावरील पाटचारीजवळ अचानक मोठे झाड बसवर कोसळले. यात चालकासह १२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुरेश पंढरीनाथ महाजन रा. यावल, इच्छाराम टिकाराम राजपूत (वय-७०) रा. सांगवी खुर्द, पंडित लक्ष्मण परणकर (वय-६६) रा. यावल, शकुंतला विलास चौधरी (वय-६०) रा. धानोरा, सुशिलाबाई किसन धनगर (वय-६०)रा. मुक्ताईनगर, जोवरा रशीद खाटीक  (वय-५०) रा. आडावद, सुरेश पंढरीनाथ महाजन  (वय-५२), पद्माबाई रमेश कोळी  (वय-५०), मंगला रामदास चौधरी (वय-५५), कल्पना संतोष चौधरी (वय-५५), दीपक येवलू वानखेडे  (वय-२४), आणि आणि नीलम शैलेंद्र पाटील  (वय-१७) असे १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, यावल आगार प्रमुख जितेंद्र जंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला व डॉ. मनिषा महाजन यांनी उपचार सुरू केले.

Exit mobile version