Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Accident : ट्रक-बसची समोरासमोर धडक; आठ प्रवासी जखमी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोरटेक गावाजवळ ट्रक व बस यांची समोरासमोर झालेल्या धडकेत आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ बुधवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान  रावेर बस आगाराची  बस क्रमांक (एचएच ४० एन ९०६३) ही प्रवासी घेवून जळगावकडून रावेरला जात होती, दरम्यान, फैजपूरकडून भुसावळकडे जाणार ट्रक (युपी ८० सीटी ७५३६) हा जात असताना भोरटेक गावाजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर घडली आहे. सर्व जखमींना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version