Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दस्त नोंदणीसाठी येतांना रॅपिड ॲन्टीजेन तपासणी अहवाल स्वीकारणार

जळगाव प्रतिनिधी ।  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने 15 मे, 2021 पर्यंत संपुर्ण राज्यात संचारबंदी लागु केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जळगांव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 भारतीय साथरोग अधिनियम, 1897 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचार बंदी लागु केली आहे. 

 

त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येतांना पक्षकारांना (नागरीकांना) दस्त नोंदणीसाठी जळगांव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येताना 48 तासाचे आत RTPCR चाचणी अहवाल निगेटीव्ह असेल तर कार्यालयात दस्त नोंदणीसाठी उपस्थित राहावे असे सुचित करण्यात आले होते.

 

तथापी, सध्याच्या कोविड परिस्थितीचा विचार करता RTPCR चाचणी अहवाल उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने व आरोग्य विभागावर आधीच असलेला ताण आणखी न वाढविता रॅपिड ॲन्टीजेन चाचणीचा अहवाल ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे विजय सु. भालेराव, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगांव यांनी कळविले आहे.

Exit mobile version