Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्राहक तक्रार निवारण मंचच्या लाचखोर अधीक्षकास अटक

aaropi 1

जळगाव प्रतिनिधी । हप्ते थकल्याने वाहन जप्तीची प्रक्रिया थांबवण्यासाठी 4 हजारांची लाच मागणार्‍या महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचचे अधीक्षकास लाचलुचपत विभागाने शुक्रवारी सकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. घनश्याम आसाराम सोनवणे (50, रा.शिव कॉलनी, प्लॉट नं 19, मारुती पार्क, जळगाव) असे अधिक्षकाचे नाव आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील तक्रारदाराने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेवून वाहन घेतले होते, मात्र उर्वरित हप्ते थकल्याने खासगी फायनान्स कंपनीने वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तक्रारदार यांनी त्यांचे वाहन जप्त न होण्यासाठी स्टे ऑर्डर मिळविण्याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे अर्ज केला होता. स्टे ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 29 ऑगस्ट रोजी चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदार याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर आज शुक्रवारी ग्राहक मंच कार्यालयाजवळील एका चहाच्या दुकानावर सोनवणे यांना बोलावण्यात आले व 4 हजारांची लाच तक्रारदाराकडून आरोपी घेत असतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात आरोपीला अटक केली. ही कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.

Exit mobile version