Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषदेत एसीबीचा ट्रॅप : वरिष्ठ लिपीकास अटक

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांना ऍप्रुव्हलसाठी दोन लाख ३० हजार रूपयांची लाच घेतांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात ऍप्रुव्हल मिळण्यासाठी तक्रारदाराच्या भावाला दोन लाख ३० हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून आज माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांना रंगेहात अटक करण्यात आली.

ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version