Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा निबंधक कार्यालयात एसीबीचा ट्रॅप : कनिष्ठ लिपीक जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । निमखेडी शिवारात सदनिका खरेदी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, ४६ वर्षीय तक्रारदार यांना निमखेडी शिवारात असलेली एका सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने खरेदीकामी त्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हा निंबधक कार्यालयात ना हरकत दाखला मिळावा यासाठी कनिष्ठ लिपीक विनोद रमेश सोनवणे (वय-४६) रा. रिधुर वाडा शनीपेठ यांनी ५ हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ४ हजार रूपये मागणी केल्याचे सिध्द झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. लाचखोर विनोद सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई प्रभारी अपर पोलीस अधिक्षक सतीष भामरे, पोलीस उपअधक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी केली.

Exit mobile version