Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन हजारांची लाच घेतांचा तलाठी गजाआड

चाळीसगाव प्रतिनिधी । मयत झालेल्या वडिलांच्या जागी उतार्‍यावर कुटुंबातील सदस्यांचे नाव लावण्यासाठी दोन हजार रूपयांची मागणी करून लाच स्वीकारणार्‍या तलाठ्यास आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव येथील तक्रारदाराचे वडील अलीकडेच मयत झाले होते. त्यांचे नावे असलेल्या शेतीला घरातील सदस्यांचे नावे लावण्याच्या मोबदल्यात तलाठी संतोष प्रताप शिखरे यांनी दि.३१/०७/२०२० रोजी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २,०००/-रूपये लाचेची मागणी केली होती. सदर लाचेची रक्कम दि.२६ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. ही लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली ही कारवाई चाळीसगाव औरंगाबाद रोडवर रांजणगाव फाट्यापासुन ५०० मीटर पुढे इस्सार पेट्रोलपंपासमोर रोडवर करण्यात आली.

या प्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून संतोष प्रताप शिखरे, (वय-३१, तलाठी- तांबोळे बु ॥, रा- शिवशक्ती नगर,चाळीसगाव) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी सुनिल कुराडे, निरिक्षक निलेश लोधी, सहा.पोलीस उप निरीक्षक रविंद्र माळी,पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, ना.मनोज जोशी,पोना.सुनिल शिरसाठ,पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्‍वर धनगर यांच्या पथकाने पार पाडली.

दरम्यान, सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव

अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
दुरध्वनी क्रं. ०२५७-२२३५४७७
मोबा.क्रं. ९६०७५५६५५६
टोल फ्रि क्रं. १०६४

Exit mobile version