Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्याजाच्या पैशांवरून व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्याजाचे पैसे घेतल्याच्या कारणावरून भुसावळ शहरातील नारायण नगर येथे एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करत दगडासारख्या वस्तूने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, किशोर उर्फ किरण उखा पाटील (वय-४७) रा. नारायण नगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून व्यापाऱ्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा भाचा उमेश राणे यांनी तेजस सपकाळे याच्याकडून व्याजाचे पैसे घेतले होते. त्या कारणावरून संशयित आरोपी गौरव बढे रा. खळवाडी, भुसावळ याने फिर्यादी किशोर पाटील यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच दगडासारख्या वस्तूने कपाळावर दुखापत करत धमकी दिली.

हा प्रकार घडल्यानंतर किशोर पाटील यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी गौरव बढे यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुपडा पाटील करीत आहे.

Exit mobile version